धाराशिव / प्रतिनिधी –
धाराशिव तालुक्यातील मौजे जवळे दु. येथील ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मागील पाच-सहा वर्षांपासून बंद असल्याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचेकडे वारंवार तक्रार व पाठपुरावा करुनही वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याची तक्रार जवळे दु येथील नागरिक श्री प्रकाश गणपती सोनार यांनी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांचे कडे केली आहे.
सन 2024 सालाच्या जुलै व डिसेंबर महिन्यात उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन वेळा पत्रे देऊन आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप कोणतीही चौकशी वा कार्यवाही केली नाही. ही बाब प्रशासकीय दृष्टीकोनातुन अयोग्य असुन शासकीय कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यपद्धतीनुसार कार्यवाही न केल्यामुळे श्री प्रकाश सोनार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नियुक्त करून सखोल चौकशी व उचित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.