नळदुर्ग प्रतिनिधी :- ( एस.के.गायकवाड) :
जि.प. प्रा.शाळा येडोळा ता. तुळजापूर येथे बाल आनंद बाजार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून या बाजार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बाजार मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्यात एकूण २० स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये भाजीपाला, वडापाव, भेळ, पाणीपुरी, पोहे. भजी. मोदक, पुरीभाजी, धपाटे, खारे फुटाणे,ज्यूस, जादूचे व विविध गमती जमतीचे खेळ, मांडण्यात आले होते. हिशोब,नफा – तोटा,बाजारातील देवाणघेवाणीचे व्यवहारात ज्ञान, त्याचे प्रत्यक्ष अनुभव मुलांना यावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास ग्रामस्थ, अंगणवाडी ताई व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भरत महाबोले सर, व श्रीमती प्रतिभा स्वामी मॅडम, तसेच अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती शितल लोंढे मॅडम, श्रीमती शोभा जाधव मॅडम यांनी परिश्रम घेतले.