जळकोट गणातून भाजपाचे अँड.आशिष सोनटक्के यांचा दणदणीत विजय
धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जळकोट गणातून भाजपाचे उमेदवार अँड. आशिष दादा सोनटक्के यांनी १५०० मताच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचे उमेदवार मोहन चव्हाण यांचा पराभव केला. भाजप नेते गणेशदादा सोनटक्के आणि त्यांचे पुत्र अँड. आशिष सोनटक्के यांनी सामाजिक कार्य सतत सुरू ठेवले आणि त्यांची जनतेशी नाळ जुळलेली आहे . जनसामान्याशी सतत संपर्कात असल्याने कामाची तत्परता यामुळे अँड. आशिष दादा सोनटक्के यांना या गोष्टीचा फायदा झाला. जळकोट पंचायत समिती मतदार संघातील या निवडणुकीकडे तुळजापूर तालुक्याचे लक्ष वेधले होते. जळकोट पंचायत समिती गणात काँग्रेस व भाजपा अशी चुरशीची लढत रंगली होती. जळकोट पंचायत समिती मतदार संघात आशिषदादा सोनटक्के यांचा विजय निश्चित मानला जात होता त्याप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केलेले विकास कामे गणेशदादा सोनटक्के यांचे दीर्घकालीन सामाजिक कार्य आणि संघटित प्रचार याचा फायदा अँड. आशिष सोनटक्के यांना झाला परिणामी ते जळकोट गणातून मोठ्या फरकाने विजयी झाले. अँड. आशिष सोनटक्के यांच्या विजयामुळे जळकोट वर पुन्हा एकदा गणेशदादा सोनटक्के यांचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले. या विजयानंतर जळकोट गावांतून जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




