खुदावाडी पंचायत समिती गणात परिवर्तनाची नांदी – भिवा इंगोले यांची पावरफुल एंट्री!
—————————
तुळजापूर (सतिश राठोड ) :-
खुदावाडी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून भिवा इंगोले यांनी दमदार एंट्री घेतली असून, मतदारांमध्ये नव्या परिवर्तनाची आशा निर्माण झाली आहे. “एकच वादा – राणा दादा” या घोषवाक्यासह ते थेट मतदार राजापर्यंत पोहोचत असून, त्यांचा प्रचार सध्या चांगलाच गती घेताना दिसत आहे.
भिवा इंगोले हे लोकप्रिय नेतृत्व असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच भाजपाचे युवा नेते सुनिल मालक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खुदावाडी गणातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक व महिला वर्गातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
आपल्या व्हिजनबाबत बोलताना भिवा इंगोले म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, तसेच या गणातील गाव, तांडा आणि वस्तीचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधा या सर्व बाबींमध्ये भक्कम काम करून गणाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भिवा इंगोले यांच्या स्पष्ट विचारसरणीमुळे आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे खुदावाडी पंचायत समिती गणात ही निवडणूक चांगलीच रंगताना दिसत असून, “विकासाला प्राधान्य” देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी काळात मतदार राजा परिवर्तनासाठी कोणाचा कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




