शहापूर जि.प. गटात शिवसेना महायुतीचे सुनील बनसोडे यांची पावरफुल एंट्री!
शहापूर गटाचा विकास हाच अजेंडा…!
———————————————————–
शहापूर / प्रतिनिधी (सतिश राठोड ) :-
शहापूर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून सुनील बनसोडे यांनी दमदार प्रवेश केला असून, गटात विकासाच्या नव्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. स्पष्ट भूमिका, ठाम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणीमुळे सुनील बनसोडे यांना सर्वसामान्य जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सुनील बनसोडे हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच भाजपाचे युवा नेते सुनिल मालक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या ताकदीवर आणि अनुभवी नेतृत्वाच्या पाठबळावर शहापूर गटात परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा निर्धार आहे.आपल्या व्हिजनबाबत बोलताना सुनील बनसोडे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना प्रभावीपणे राबवून शहापूर गटातील प्रत्येक गाव, तांडा व वस्तीपर्यंत विकास पोहोचवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार, शेतकरी हित आणि मूलभूत सोयीसुविधा या सर्व बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहापूर गटातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका सुनील बनसोडे यांनी मांडली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. “शहापूर गटाचा विकास हाच अजेंडा” या ठाम भूमिकेमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होत असून, आगामी काळात मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




