पारदर्शक प्रशासन, काम करणारे नेतृत्व हेच विकासाचे खरे सुत्र – जिल्हाध्यक्ष कुलकर्णी
अणदूर प्रतिनिधी :-
अणदूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार अॅड. दिपक महादेवाप्पा आलूरे तसेच अणदूर पंचायत समितीच्या उमेदवार रणवीर सुनील चव्हाण तसेच चिवरी पंचायत समितीच्या उमेदवार प्रविण भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
धाराशिव जिल्ह्यासाठी शासनाने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि त्यातून निर्माण झालेल्या व होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व हेच जिल्ह्याच्या विकासाचे खरे सूत्र असून, त्या दृष्टीने दिपक आलूरे आणि रणवीर चव्हाण हे विकासाभिमुख व जनतेशी सतत संपर्कात असलेले उमेदवार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुनील मालक चव्हाण,नितीन काळे, अनिल काळे, साहेबराव घुगे,दिपक घोडके,उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार,धनराज मुळे,बालाजी मोकाशे, डॉ.विवेक बिराजदार, सिध्दाराम धमुरे, गणेश सुर्यवंशी, पृथ्वीराज मुळे, विक्रांत दुधाळकर, सचिन बिराजदार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक मित्र,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




