विकासाचा ठाम संकल्प – अणदूर प स भाजपा महायुतीचे उमेदवार रणवीर चव्हाण यांची पावरफुल एन्ट्री
अणदूर प्रतिनिधी :- (दि. ६)
तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार रणवीर चव्हाण यांनी विकासाचा ठाम संकल्प घेऊन निवडणूक मैदानात दमदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या गणातील राजकीय वातावरण तापले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अणदूर पंचायत समिती गणातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या, शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांना प्राधान्य देत सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार रणवीर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. “हा गण विकासापासून वंचित राहू नये, प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.महायुतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांच्या उमेदवारीमुळे तरुण, शेतकरी तसेच महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचारादरम्यान नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
विकासाच्या मुद्दयावर रणवीर चव्हाण याना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -




