जळकोट ,(मेघराज किलजे) :-
लोहारा पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू असुन, या निवडणुकीत बाजी कोण मारणार..! याची चर्चा जोरात आहे.लोहारा तालुक्यातील भातागळी व माकणी पंचायत समिती हे दोन गण सभापतीपदासाठी आरक्षित असल्याने या दोन गणावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे .दोन्ही गण प्रतिष्ठेची झाली आहेत.
भातागळी पंचायत समिती गण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून तसेच पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी राखीव असल्याने येथील विजयी उमेदवाराला सभापतीपदाची संधी मिळू शकते. यासाठी या गणात अधिकच चुरस निर्माण झाली आहे. या गणात भाजपकडून दत्तात्रेय वाघमारे यांना उमेदवारी मिळाली आहे. यांचा मोठा गावागावात मोठा जनसंपर्क आहे.जेष्ठ अनुभवी व मतदारपर्यंत थेट संवाद तर उबाठा सेनेकडून पंडित बारगळ यांचे चिरंजीव विनायक बारगळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंडित बारगळ हे जुने, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते व सक्रिय नेते आहेत.परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. गणातील कास्ती( बु .)येथील तीन चार वर्षापासून पक्षाच्या माध्यमातून संघटन वाढवण्यासाठी गावात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारापर्यंत थेट संपर्क असलेला युवा चेहरा असल्याने कार्यकर्ते दंडगुले यांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार सुयशकुमार दंडगुले हे तर भातागळी येथील स्थानिक रहिवासी असलेले तरुणाईचा नवा चेहरा प्रामाणिक उद्योग क्षेत्रातून गणातील व गटातील जनतेशी नाळ जोडलेला मेहनती, विविध कार्याच्या माध्यमातून मतदारांशी थेट संबंध असणारे एक युवा प्रतिनिधित्व अपक्ष उमेदवार शुभम पोतदार यांच्यात अटीतटीचा सामना रंगला असताना भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार सुयशकुमार दंडगुले व अपक्ष उमेदवार शुभम पोतदार या दोन तरुण चेहऱ्याने या गणातील सर्वच गावात युवक संपर्क, बैठका, महिला मेळावा, युवक, शेतकरी, गृहभेटीच्या माध्यमातून संपर्क संवाद साधला आहे.
या गणात भाजपा सहित, उबाठा व भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार व अपक्ष उमेदवार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा गावातील सर्व सुज्ञ मतदार,शेतकरी,महिला,युवक, पक्षातील नाराज पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यातून तसेच सर्व स्तरातून चर्चा होत आहे.
तसेच पंचायत समिती माकणी ही गण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून तसेच पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी राखीव असल्याने
माकणी गणातून महिलाशी बचत गट विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपर्क असल्यामुळे उबाठा सेनेचे अधिकृत उमेदवार महादेवी रमेश कलशेट्टी व दादासाहेब जानकर यांचा मोठा जनसंपर्क, मतदाराची थेट संवाद असल्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती शिंदे सेनेकडून पल्लवी दादासाहेब जानकर हे रिंगणात आहेत. यापूर्वी पंचायत समितीच्या कामकाजाचा अनुभव असणारे अपक्ष उमेदवार सौ. लता प्रकाश घोडके ही तिरंगी लढतही चूरशीची असून दोन पक्षाचे अधिकृत उमेदवार व एक अपक्ष उमेदवार या तिघापैकी गणातील सुज्ञ मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकतो . या होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन राहणार आहे. तालुक्यातील भातागळी व माकणी पंचायत समिती गणातून निवडुन येणारा लोहारा पंचायत समितीचा सभापतीचा दावेदार ठरणार आहे.
या दोन्ही पंचायत समिती गणात यावेळेसची निवडणूक अत्यंत चुरशीची व समीकरणांवर आधारित ठरणार असून मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो. हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची व रंगतदार होणार आहे.हे मात्र निश्चित आहे. लोहारा पंचायत समितीचा भावी सभापती कोण होणार ? याची उत्सुकता लागुन राहिली आहे.




