विकासाचा ठाम संकल्प : भाजप महायुतीच्या उमेदवार ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांची दमदार एंट्री
———————-
सतिश राठोड ( तुळजापूर ) :-
जळकोट जिप गटाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांनी निवडणुकीच्या रिंगणात दमदार एंट्री केली आहे. विकासाचा ठाम संकल्प घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच भाजपाचे युवा नेते सुनिल मालक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतीताई चव्हाण या निवडणूक लढवत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना जळकोट जिप गटातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे. “जिप गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा व्हिजन असून, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जळकोट जिप गटाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू,” असा विश्वास ज्योतीताई चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. विकासाभिमुख नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि लोकांशी थेट संवाद हे त्यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत आहे.जळकोट जिप गटाच्या विकासासाठी ठोस कामगिरी करण्याचा निर्धार ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.




