spot_img
-6.9 C
New York
Thursday, February 5, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

विकासाचा संकल्प ठाम -संजय राठोड यांची खुदावाडी गणात पॉवरफुल एंट्री

विकासाचा संकल्प ठाम -संजय राठोड यांची खुदावाडी गणात पॉवरफुल एंट्री

———————

तुळजापुर (सतिश राठोड ):- खुदावाडी पंचायत समिती गणात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राठोड यांनी विकासाचा ठाम संकल्प घेत निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे गणात राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.संजय राठोड हे सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्कात असणारे, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खुदावाडी गणातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी आणि रोजगार या मुद्द्यांवर केंद्रित विकासाचा स्पष्ट अजेंडा त्यांनी मांडला आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, गावपातळीवर आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि माता-बाल आरोग्यावर विशेष भर देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, शाळांची भौतिक सुविधा सुधारणे, डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमात आहे.

गणातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सर्व अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, नवीन सिमेंट रस्त्यांची कामे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन संजय राठोड यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नवीन जलस्रोत, नळ पाणीपुरवठा योजना आणि देखभालीवर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

“खुदावाडी गणाचा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव ध्यास आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक गाव, प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या एकसंध पाठिंब्यामुळे आणि स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता खुदावाडी गणात ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या