spot_img
-0 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

आमदार राणाजगजिसिंह पाटील व भाजपाचे युवा नेते सुनिल चव्हाण यांच्यावतीने प्रवीण पवार यांचा सत्कार 

आमदार राणाजगजिसिंह पाटील व भाजपाचे युवा नेते सुनिल चव्हाण यांच्यावतीने प्रवीण पवार यांचा सत्कार

——————–

धाराशिव ( सतिश राठोड ) :- भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व लोकप्रिय नेतृत्व असलेले व शासनाच्या तांडा समृध्दी योजनेचे विभागिय अशासकिय सदस्य प्रवीण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपाचे युवा नेते सुनिल चव्हाण यांच्यावतीने प्रवीण पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी केक कापून प्रवीण पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सुनिल चव्हाण म्हणाले की, “प्रवीण पवार हे पक्षासाठी नेहमीच तळागाळात काम करणारे नेतृत्व असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना प्रेरणा मिळत आहे.” भविष्यातही पक्षाच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रवीण पवार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “भाजपाच्या विचारधारेतून जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी सदैव प्रयत्न करेन.”कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी प्रवीण पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या