नळदुर्ग नप स्विकृत सदस्यपदी लहुजी शक्तती सेनेचे गायकवाड यांची निवड
——————-
नळदुर्ग ( सतिश राठोड ) :-
नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले असून नगराध्यक्ष सह अकरा नगरसेवक निवडून आले आहेत या निवडणुकीत लहुजी शक्तती सेना मातऺग समाजाची निर्णायक भूमिकेमुळे नळदुर्ग नप स्विकृत सदस्य पदी लहुजी शक्ती सेनेचे प्रवीण गायकवाड याची निवड करण्यात आली आहे.
निवडणुकी दरम्यान माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मातऺग समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार दादानी दिलेला शब्द पाळत आज मातऺग समाजाला नगरसेवक पद दिले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, युवा नेते सुनील चव्हाण, भाजपा नेते नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष बसवराज आपा धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरजी जाहगीरदार, गटनेते दत्तात्रय दासकर, नगरसेवक रिझवान काजी. लहुजी शक्तती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते लहुजी शक्ती सेनेचे नळदुर्ग शहराध्यक्ष प्रविण धनराज गायकवाड यांना नळदुर्ग नप स्विकृत सदस्य पदाच्या निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी धनराज गायकवाड, धर्मराज देडे, महादेव मोरे, नाना गायकवाड, आजय गायकवाड, नारायण हजारे, नवनाथ काळे, विकास गायकवाड, विजय गायकवाड, प्रकाश काळे, गोरख पारधे, किशोर क्षिरसागर, महादेव काळे, मोहन काळे, धनराज चव्हाण, लहुजी देडे, किरण काळे, अविनाश काळे, वैभव काळे मोरेश्वर देडे, आकाश गायकवाड, खडू गायकवाड सह लहुजी शक्तती सेनेचे प्रमुख पदाधिकारी, महीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




