कामगार नेते सुरेश पवार याना आदर्श संघटना पुरस्काराने सन्मानित
—————–
धाराशिव ( सतिश राठोड ) :-
राष्ट्रसंत डॉ.रामराव (बापू)महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन,भारत यांच्या वतीने तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेस आदर्श संघटना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धाराशिवचे सुरेश पवार हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असुन त्यानी निस्वार्थ भावनेने सर्वसामान्य जनतेच्या समस्याची सोडवणूक करित असत तसेच ऊसतोड कामगारांना त्यांचे हक्क, अधिकारी,मिळवून दिले आहेत व इतर अनेक क्षेत्रातउल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र, धर्मपीठ,शक्तिस्थळ पोहरादेवी येथील पवित्र मंचावर १ १ जानेवारी रोजी सुरेश पवार याना आदर्श संघटना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. यावेळी महंत शेखर महाराज,जितेंद्र महाराज,सुनिल महाराज,भक्तराज महाराज,मध्यप्रदेशचे मंत्री बाबुलालजी बंजारा,विजय भाऊ रामावत यांच्या साक्षीने सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.संघटनेच्या वतीने निष्ठेने केलेल्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळण्याच्या कार्यात गाव, तालुका, जिल्हा,राज्य पातळीवर कार्यरत असलेले पदाधिकारी यांनी केलेले प्रयत्न,योगदानामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे अशि प्रतिक्रिया पवार यानी दिली. पुढे बोलताना म्हणाले की, महंतांच्या साक्षीने मिळालेली हि सनद आणि अविरतपणे काम करण्याची जबाबदारी मिळाली. हे आशीर्वादाने कधीच विसरणार नाही. असेही शेवटी बोलताना केले.




