काक्रंबा गटात अस्मिता कांबळे यांना उमेदवारी द्यावी
भाजपा कार्यकर्त्याची मागणी
अणदूर : प्रतिनिधी :- ( चंद्रकांत हगलगुंडे)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रचारासाठी काळ अगदीच कमी आहे . तरीसुद्धा इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये गेली दोन महिन्यापासूनच तयारी केली असून काक्रंबा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या अस्मिता कांबळे यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे .
अस्मिता कांबळे या जिल्हा परिषदेला अध्यक्ष होत्या . त्यांचे वडील शिवदास कांबळे हे सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते . अस्मिता कांबळे यांनी शहापूर आणि मंगरूळ या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून विक्रमी मताने विजयी झाल्या . त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगले असे काम केले . सार्वजनिक पाणीपुरवठा रस्ते विज जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा निधी ज्या त्या मतदारसंघासाठी पूर्णपणे राबवल्या .
शिवदास कांबळे यांनी मंगरूळ आणि काक्रंबा मतदार संघामधुन निवडणूक लढवली विक्रमी मताने निवडून आले . मंगरूळ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर समाज कल्याण सभापती झाले आणि काक्रंबा मतदार संघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले .
कार्य काळामध्ये त्यांचेही काम ज्या त्या मतदारसंघाच्या परिपटलावर आहे .
अस्मिता कांबळे यांना जर काक्रंबा मतदार संघातून भाजपा कडून उमेदवारी दिली तर विजय हा तर निश्चित आहेच . कारण तुल्यबळ असा समोर विरोधी उमेदवार नाही आणि अस्मिता कांबळे यांचे काम निश्चितच वाखाण्याजोगे आणि कौतुकास्पद झाले आहे . आगामी काळातही काम होईलच त्यांच्या वडिलांचा वारसा ते चालवत आहेत खऱ्या अर्थाने काक्रंबा गटाचा विकास जर करायचा असेल तर अस्मिता कांबळे यांना उमेदवारी द्यावी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हे कार्यकर्ते घेतील यात काय शंका नाही अशा पद्धतीची मागणी भाजपा कार्यकर्त्याकडून होत आहे .




