spot_img
7.4 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

प्रत्येक गावच्या विकासाचे होणार मास्टर प्लॅनिंग तुळजापूर पंचायत समितीत झाली प्रशिक्षण कार्यशाळा

 

तुळजापूर (सतीश राठोड ) :-

तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने तुळजापूर पंचायत समितीत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे तीन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.जीपीडीपी या उपक्रमा अंतर्गत सन २०२६ -२७ चा विकास आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले . कार्यशाळेत मास्टर ट्रेनर मारुती बनसोडे प्रवीण प्रशिक्षणार्थी व विस्ताराधिकारी अवघतराव कावळे व ज्योती नाईक विस्ताराधिकारी पंचायत यांनी प्रशिक्षणार्थींना यशस्वीरित्या मार्गदर्शन केले. ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे गावच्या गरजा ओळखून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला विकास आराखडा शास्त्रीय पद्धतीने तयार केल्यास गावच्या सर्वांगीण विकासात भर पडेल अशी प्रतिक्रिया तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी बोलताना केले. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी व निधी चोख नियोजन कसे करायचे याबाबत सविस्तर या प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली प्रसंगी प्रत्येक गावचे सरपंच हे उपस्थित होते. गावच्या विकासामध्ये भर कशा पद्धतीने होईल याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले . याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद भाऊ रेड्डी व सय्यद व गोरोबा गायकवाड , ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त करून कार्यशाळेची सांगता केली.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या