spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

शिवसेना पक्षाची तुळजापूर तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी संघटन मजबूत

 

तुळजापूर प्रतिनिधी : –

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने तुळजापूर तालुक्यात संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेत तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,जिल्हाप्रमुख मोहन पनूरे,तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या नव्या कार्यकारणीत तुळजापूर तालुका उपप्रमुखपदी शहाजी ज्ञानोबा हाक्के,विकास पोपटराव जाधव व दत्तात्रय गंगाराम सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.तसेच जिल्हा परिषद गटांमध्ये काटगाव – सूर्यकांत नागनाथ जोकार,काटी – दत्तात्रय काशीनाथ डोके,मंगरुळ – रविकिरण विजयकुमार पाटील,शहापूर – राम नागनाथ काळे,जळकोट – दिपक शिवाजी मोटे,अणदूर – गणेश सिद्धाराम नरे,काक्रंबा – प्रशांत भारत गरड यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

तसेच पंचायत समिती गटांमध्ये सिंदफळ – दिनेश शहाजी धनके व आपसिंगा – आबा भगवान गुरव यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकारणी जाहीर होताच तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचा संघटनात्मक प्रभाव पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वयबळावर लढण्याचा निर्धार शिवसेना पक्षाने केल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत व्हावी, प्रत्येक विभागात सक्षम नेतृत्व उभे राहावे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना संधी मिळावी, या उद्देशाने विविध भागांतील व विविध सामाजिक गटांतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या निवडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,युवा सेनेचे तालुकाप्रमुख गणेश पाटील,तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,शहर संघटक नितीन मस्के,संजय लोंढे,बाळू भैय्ये,अनिता लष्करे,स्वप्निल सुरवसे,राम माने यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

नव्या जम्बो कार्यकारणीमुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेना अधिक जोमाने काम करणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या