धाराशिव (सतीश राठोड ) :-
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सोलापूर यांच्यावतीने राज्यातील नवनिर्वाचित बंजारा नगरसेवकांचा 28 रोजी रविवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा मा. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड यांच्या शुभहस्ते सोहळा पार पडणार आहे. आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संतोष पवार संस्थापक मार्ग फाउंडेशन , संजय राठोड जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ लातूर , प्रकाश राठोड माजी नगरसेवक लातूर महानगरपालिका , भोजराज पवार माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका , संदीप राठोड जिल्हाध्यक्ष वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार समिती सोलापूर , अलकाताई राठोड माजी महापौर सोमपा सोलापूर , सुभाष चव्हाण माजी सभापती परिवहन समिती सोमपा सोलापूर, मोतीराम राठोड माजी सदस्य पंचायत समिती अक्कलकोट यासह विविध संस्थेचे पदाधिकारी समाजसेवकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी दिनांक 28 डिसेंबर रविवार रोजी दुपारी बारा वाजता पूजा लॉन्स पोतदार इंटरनॅशनल स्कूल शेजारी प्रताप नगर रोड विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी सत्कार सोहळा समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सोलापूर जिल्हा व समस्त बंजारा समाज सोलापूर शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.




