धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेशराव सोनटक्के मित्र परिवाराच्या वतीने नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नळदुर्ग येथील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जळकोट येथे गणेश सोनटक्के मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या बसवराज आप्पा धरणे यांनी बलाढ्य उमेदवारांना धूळ चारत ४३३१ मते मिळत दणदणीत व निर्णायक विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक नय्यरपाशा जहागीरदार, दत्तात्रय दासकर, रिझवान काझी, शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, सुमनताई ठाकूर, क्षमा बाई राठोड , राणीताई सुरवसे, मीनाक्षीताई काळे, किशोर नळदुर्गकर व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा सोनटक्के, भाजपाचे विलास राठोड, दत्ताभाऊ राजमाने, सभापती आशिष सोनटक्के, संजय अंगुले, हनुमंत अंगुले, पत्रकार अरुण लोखंडे, विजय पिसे, मंगेश सुरवसे,बाळासाहेब पाटील, तमनप्पा माळगे, नागनाथ किलजे, सय्यद तांबोळी, संतोष वाघमारे, सदाशिव हासुरे, ज्ञानेश्वर साखरे, प्रवीण पाटील, परमेश्वर मडोळे, तम्मा कुंभार आदी भाजपाचे जळकोट व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




