धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
दिनांक: 22 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जळकोट ता.तुळजापूर जि. धाराशिव या शाळेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. सुरवातीला भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी मोनिका चव्हाण कुमारी नेहा राठोड व कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेंद्र गुरव सर प्रमुख पाहुणे श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती आशा पवार मॅडम, श्रीमती प्रा ज्योतिका चव्हाण मॅडम, प्राथमिक आश्रम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम व प्रा अप्पासाहेब साबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण कांबळे सर यांनी गणितीय दिनाचे महत्त्व विशद केले. आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थी गणितीय दिनाबद्दल माहिती सांगितली. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटचे सचिव संतोष चव्हाण साहेब यांच्या वतीने प्राध्यापिका ज्योतिका चव्हाण मॅडम यांच्या हस्ते आश्रम शाळेतील गणित विषय शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गणितीय शैक्षणिक साहित्यांचा प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा घेण्यात आले. श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम यांनीही गणित विषय किती सोपा आहे हे आपल्या मनोगतात सांगितले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेंद्र गुरव सरांनी रामानुजन बद्दल खुप चांगल्या पध्दतीने माहिती सांगितले . गणिताचे उपयोग आपल्या जीवनात किती होऊ शकतो या बद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. शेवटी गणित शैक्षणिक साहित्यांचा प्रदर्शन भरवण्यात आले होते त्या प्रदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी गणित विषय किती सोपा आहे हे समजून घेतले. या कार्यक्रमाला प्रा. बालाजी राठोड, प्रा संतोष दुधभाते ,प्रा सुरेश कोकाटे , प्रा अश्विनी लबडे ,श्रीमती कल्पना लवंद मॅडम, कुमारी मयुरी कांबळे मॅडम, अभिजीत चव्हाण सर , खंडेराव कारले सर, बिळेणसिध्द हक्के सर, दुर्गेश कदम सर, सागर चव्हाण सर ,शंकरराव चव्हाण शिक्षकेत्तर कर्मचारी बालाजी अहंकारे, सुग्रीव देवकते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमिला कुंचगे मॅडम तर आभार देवानंद पांढरे सर मानले.अशा पध्दतीने आमच्या आश्रम शाळेत गणित दिन साजरा करण्यात आला.




