धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
दिनांक 16 /12/2025 रोजी गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती तुळजापूर व नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात
प्राथमिक गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शहापूर तालुका तुळजापूर येथील उपक्रमशी प्राथमिक शिक्षक श्री. सोनवणे दयानंद नामदेव यांच्या स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचा
प्रथम क्रमांक आला असून जिल्ह्य स्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.गणित विषयावर आधारीत तयार केलेल्या शै.साहित्याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, गटशिक्षणाधिकारी अर्जून जाधव,
नळदूर्ग बीट च्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शोभा राऊत मॅडम, केंद्र प्रमुख राहूल जाधव, सत्तेश्वर जाधव, मुख्याध्यापक सचिन कुमार ढेपे,शिक्षक,शा.व्य.समिती अध्यक्ष, सदस्य,पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




