spot_img
5.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

उपसरपंचानी गावासमोर जाहीर माफी मागावी – सरपंच गजेंद्र कदम

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावात शांततेचे वातावरण आहे. गावात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक एकता व्यवस्थित असताना, या वातावरणाला तडा देण्याचे काम भ्रष्टाचाराचे आरोप करून करण्यात आले आहे. उपसरपंच त्यांनी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने गावच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. गावच्या ग्रामपंचायत समोर बोलावलेल्या ग्रामस्थांच्या सोक्षमोक्ष सभेत ग्रामपंचायतच्या बँक खात्याच्या जमाखर्चाच्या पत्रकाचे वाटप करत सरपंच गजेंद्र कदम यांनी उपसरपंच यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी ग्रामस्थासमोर केली.

जळकोट ग्रामपंचायतच्या उपसरपंचानी ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने विद्यमान सरपंच गजेंद्र कदम यांनी मंगळवार (दि.४) रोजी गावकऱ्यांना या भ्रष्टाचारा संदर्भात उत्तर देण्यासाठी जाहीर आवाहन करून सोक्षमोक्ष सभा लावली होती. या सभेकडे ग्रामस्थाबरोबर विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात झाली,

प्रथम शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हालग्याच्या आवाजात सोक्षमोक्ष सभेला सुरुवात झाली, सरपंच गजेंद्र कदम यांनी उपसरपंच यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गावची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावच्या इतिहासात के, विठ्ठलराव पाटील यांच्या कार्यकाळापासून उपसरपंचपदाला एक चांगला इतिहास आहे. ह्या गौरवशाली इतिहासाला सध्याच्या उपसरपंचांनी भ्रष्टाचाराचे आरोप
करून वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे. सरपंच गजेंद्र कदम यांनी वित्त आयोगातील झालेल्या व्यवहाराचे बैंक स्टेटमेंट ग्रामस्थांना वाटप केले. आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करून आपण विकास कामाला प्राधान्य देऊन काम केले असल्याचे सांगितले.

या सभेला उपसरपंच गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे तर्कवितर्क काढले जात होते. काही गावकरी उपसरपंच यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करत होते. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सभेला माजी सरपंच अशोकराव पाटील, महेश कदम, कृष्णात मोरे, अनिल छत्रे,

राजकुमार पाटील, बसवराज कवठे, कल्याणी साखरे, बसवराज भोगे, नितीन माळी, सुदीप चौधरी, शिवराम कदम, नामदेव कागे, शंकर वाडीकर, संतोष वाघमारे, हनुमंत सुरवसे, प्रवीण पाटील, विश्वास भोगे, लह कदम, पिंटू चुगे, सिद्धार्थ लोखंडे, नसीर इनामदार आदिसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या