नळदुर्ग प्रतिनिधी :-
सोशल मीडियावर नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीचा आखाडा आता पेटताना दिसत आहे . बसवराज धरणे यांना नगराध्यक्ष पदांची भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच ते युवकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आले आहे. त्यामुळे धरणे यांच्याबद्दल तरुणाईत क्रेझ वाढताना दिसत आहे.
निवडणुकीवरुन विरोधकाचे काही कार्यकर्ते धरणे यांच्या बद्दल पोस्ट टाकताच बहुतांश युवकांनी विरोधकांना फैलावर घेतल्याने निवडणुकीचा आखाडा रणसंग्रामाने गाजण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुक प्रचाराचा शुभारंभ होण्यापुर्वीच नळदुर्ग शहरात लोकशाहीचा उत्सव असणा-या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकी विषयी सर्वांनाच झपाटले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.परिसरातील ऊसतोड कामगारापासुन ते शहरातील प्रत्येक घटकांसमोर पडलेला यक्षप्रश्न म्हणजे नळदुर्गचा नगराध्यक्ष कोण होणार? त्यातच बसवराज धरणे यांच्या समर्थनात तुफान प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटताना दिसत आहे.
आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. बसवराज धरणे यांच्याविषयी समर्थकानी प्रतिक्रिया देताच विरोधकांच्या समर्थकानीही संबंधित पोस्टबद्दल कॉमेंट्स करीत असल्याचे व्हायरल होत आहे. त्यातुनच विकासकामे व गैरप्रकार याबद्दल आरोप प्रत्यारोप जोरदार पणे होत असल्याची खमंग चर्चा रंगल्याने मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे.त्याचबरोबर काँग्रेसचे अशोक जगदाळे, अजित पवार गट राष्ट्रवादीचे संजय बताले, एम आय एमचे शहबाज काझी यांच्या बद्दल सोशल मिडियावर धुमाकूळ सुरु आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेबुब शेख यांच्याबद्दल सर्वत्र शांतता असल्याची चर्चा नागरिकात होत आहे.




