गोरगरीब जनतेचा विचार करणारे पाटील कुटुंब यामुळेच मी माझं दैवत समजतो एक शेतकरी पुत्र
धाराशिव –
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवलेली आहे. जिल्हा आणि परिसरातील सर्वच जन पाटील कुटुंबीयांचा अविभाज्य भाग आहात. त्यामुळेच अतिशय संवेदनशीलपणे विचार करुन मल्हार व साक्षी यांचा हा मंगल विवाह सोहळा मर्यादित स्वरुपात पार पाडण्याचा निर्णय अर्चना ताई व राणाजगजीतसिंह पाटील यांच्या परिवाराने घेतला आहे.
मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र तुळजापुर येथील परिसरात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यथावकाश जिल्ह्यातील परिस्थिती अनुकुल झाल्यानंतर, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत शुभाशीर्वाद सोहळा व स्नेहभोजन आयोजित केले जाणार असे अर्चना ताई पाटील यांनी कळविले आहे.




