अणदूर प्रतिनिधी :-
धाराशिव जिल्हा परिषद सामान्य प्रशासन ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथे कर्तव्यात असलेले ग्रामसेवक महेश मोकाशे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल मोकाशे यांचा दहिटणा ग्रामपंचायत वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच परमेश्वर कांबळे, युवा नेते सुनील कदम,माजी सरपंच बसवराज पाटील, मच्छिंद्र माने, आप्पासाहेब बिराजदार,उमाकांत कदम, माजी तंटामुक्त अध्यक्ष बलभीम कदम, संजय कदम, बलभीम गुड्डे, राजेंद्र नागरसे, बब्रुवान चव्हाण,इलाई शेख शरद कांबळे आदी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




