उमरगा -ज्ञानेश्वर गुरव
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील हायस्कूल चा माजी विध्यार्थी मेळावा दि.24 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
तब्बल 27 वर्षानंतर सर्व वर्गमित्र -मैत्रिणीं अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, गुजरात इत्यादी भागामध्ये आपल्या कामानिमित्त, नोकरी निमित्त, उद्योगधंद्यात व्यस्त असणारे सर्वच एक दिवस स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी सर्व मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आतुर होऊन हजर होते.
त्यावेळी शिकवलेले गुरुजी आणि कार्यरत शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आष्टा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ओमप्रकाश चौधरी होते.
सरस्वती पूजन करून राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशालेतील दिवंगत माजी शिक्षक व जे विद्यार्थी मयत आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*”एक अतूट बंधन टॅक लाईन”* असलेल्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करतेवेळी प्रस्तावना मुकेश सोमवंशी यांनी सादर केले, तर शिक्षकांचा सत्कार समारंभ आणि कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन धनराज आळंगे यांनी केले.उपस्थित सर्व गुरुजीचा सन्मान करण्यात आला.
विध्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना गुळे बालाजी यांनी आपल्या शालेय जीवनातील आणि आयुष्यातील संघर्षमय अनुभव सांगितली. तसेच मैत्री वर आधारित गीत आणि कविता गाऊन कार्यक्रमाची विलक्षण रंगत वाढवली. त्याचबरोबर विश्वंभर शिंदे, कविता राठोड, छाया स्वामी, सविता मोटे, सुनीता सुलतानपुरे यांनी गीत गाऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये त्याग आणि ज्ञान महत्त्व प्रदीप फुंडीपल्ले यांनी व्यक्त केले, मुख्याध्यापक सावंत यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबतची गोडी निर्माण व्हावी व शाळेसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप शरणप्पा फुंडीपल्ले यांनी करतेवेळी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत नेले आणि सध्याच्या पिढीने आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार सदाशिव सोमवंशी यांनी व्यक्त केले.
विशेषबाब म्हणजे सर्व मित्र हे एकच ड्रेस कोडमध्ये पांढरा नेहरू शर्ट व विजार आणि मैत्रिणींचा गुलाबी साडी पेहराव केला होता.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते पण तरीही गेली अनेक वर्ष मुलां-मुलींना एकत्रित करण्याचे काम केले त्यात महादेवी कोळी, अनिता कोरे, सविता मोटे यांनी सर्व मुलींची जबाबदारी घेतली तर गेट टुगेदरची संकल्पना रवींद्र मारेकर, विश्वंभर शिंदे, रामचंद्र चौधरी, खंडू सुलतानपुरे, गुणवंत माने यांनी मांडली.
हा कार्यक्रम यशस्वीते साठी प्रेमनाथ दासीमे, महादेव रनखांब, पाशा खुटेपड, संजय शिदोरे, महेश सूर्यवंशी, बसवराज कोंडे, प्रशांत आळंगे, मुकेश सोमवंशी, धनराज आळंगे यांनी परिश्रम घेतले.



                                    
