धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य जय हनुमान भजनी मंडळ शाखेच्या बोर्ड फलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी साहित्य परिषदेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पांडुरंगाची महाआरती करण्यात आली . यावेळी हभप मोहन आप्पा महाराज वाघुलकर वारकरी साहित्य परिषद धाराशिव तालुका अध्यक्ष , हभप सुनील महाराज डगे तुळजापूर तालुका अध्यक्ष , हभप अमोल महाराज गुरव उपाध्यक्ष, हभप आकाश महाराज इटकळ तालुका सचिव यांच्या हस्ते येथिल जय हनुमान भजनी मंडळ शाखेच्या बोर्ड फलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. यात जय हनूमान भजनी मंडळ अध्यक्षपदी सोपान श्रीकांत पांचाळ , शैलाताई बाबुराव जवळगे , उपाध्यक्ष मल्लिनाथ सालगे ,पार्वती दिगंबर बोगरगे , सचिव लक्ष्मण बो बोंगरगे , देवीबई गुंडाप्पा कापसे , सहसचिव मनिषा मनोहर सांगवे , कोषाध्यक्ष राजेंद्र पांचाळ , अर्चनाताई संदिपान नरवडे यांची निवड तर 32 सदस्यांची देखील निवडी करण्यात आली. यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप ओंकार पांचाळ,हभप राम व्हलदुरे, हभप संदीपान नरवडे, हभप भिमराव काटे यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे नागनाथ बोगरगे,सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे, सामाजिक कार्यकर्ते शरणाप्पा कबाडे, भीमाशंकर कबाडे , माजी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे , तंटामुक्त अध्यक्ष ब्रह्मानंद कापसे यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते .



                                    
