spot_img
14.6 C
New York
Monday, November 3, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता सागर दुरुगकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसंघटनेत जाहीर प्रवेश

वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, संपर्कप्रमुख मा. श्री. सुनीलजी काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मा. श्री.नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री.कैलास दादा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सौ.श्वेता सागर दुरुगकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

 

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला.

 

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, युवासेना उपसचिव मनिषाताई वाघमारे, शिवसेना जिल्हा समन्वयक दिनेश दत्ता बंडगर,शिवसेना धाराशिव शहर प्रमुख श्री सोमनाथ गुरव, नगरसेवक श्री तुषार निंबाळकर, श्री गणेश असलेकर, माजी नगरसेवक श्री रोहित निंबाळकर, शिवसेना शहर उपप्रमुख श्री बंडू आदरकर श्री पंकज पाटील, श्री अभिजित देशमुख, शिवसेना शाखाप्रमुख श्री मंगेश निंबाळकर,हर्षद ठवरे, सुधीर अलकुंटे,श्री सागर दुरुगकार, श्री प्रतीक निंबाळकर, श्री अभिजीत निंबाळकर,श्री सह्याद्री राजेनिंबाळकर, श्री सात्विक दंडनाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या