तुळजापूर प्रतिनिधी :-
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शिवसेनेचा विस्तार मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातही संघटन विस्ताराचा धडाका सुरू असून आतापर्यंत तब्बल ४५ हून अधिक गावांमध्ये शाखा उद्घाटन सोहळे उत्साहात पार पडले आहेत.
या मोहिमेचे नियोजन पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते आणि धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम तुळजापूर तालुक्यात जोमाने राबवली जात आहे.
अलीकडेच तालुक्यातील काटी, वडगाव काटी आणि बिजनवाडी या गावांमध्ये झालेल्या शाखा उद्घाटन कार्यक्रमांनी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिक, युवक व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. उद्घाटनावेळी झालेल्या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले.
उद्घाटन सोहळ्यांदरम्यान तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
या कार्यक्रमांना तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, संभाजी नेपते, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, संजय लोंढे, नितीन मस्के, गणेश पाटील, विकास जाधव, भुजंग मुकेरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक गावात शाखा स्थापन होत असल्याने तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेची संघटनात्मक घडी अधिक मजबूत होत आहे. कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह, गावागावातील लोकांचा प्रतिसाद आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक ठोस आणि बळकट पाया रचत आहे.
राजकीय वर्तुळात सध्या याच चर्चेला ऊत आला असून,
- Advertisement -



                                    
