अणदूर प्रतिनिधी : -(दि.19)
सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी येथील कामे अर्धवट तरीही गैरसोनीयुक्त वसुली मात्र जोमात या कारभारा विरुद्ध उद्या दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाहनधारकांच्या हुकूमशाही टोल नाका वसुली विरोधात चक्काजाम आंदोलन व टोल नाका वसुली बंदची हाक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुमार घुगरे यांनी संबंधितांना दिला आहे.
जगाच्या इतिहासात नोंद ठरलेल्या फुलवाडी टोल नाका उमरगा -सोलापूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे, नियमबाह्य घीसाड घायीने काम करून निव्वळ आर्थिक हित जोपासण्याचे काम येथे झाले आहे. गेल्या 14 वर्षापासून अत्यंत निकृष्ट, प्रवाशांच्या जीवाशी, वाहनधारकांच्या जीवाशी खेळून टोल वसुली मात्र आकाच्या मार्गदर्शनाखाली बेधुंद चालू आहे. हे सर्व गेली 14 वर्षापासून कसे काय चालू आहे हा शोधाचा विषय असला तरी प्रवासी वाहनधारक यांची मात्र पुरेपूर लूट होताना दिसत आहे.
याबाबत अनेक वेळा आंदोलन, रस्ता रोको ,टोल वसुली बंद झाले मात्र पुनश्च पूर्वपदावर येऊन वसली चालूच आहे याविरुद्ध आंदोलन व चक्काजाम करण्याचा इशारा वरिष्ठांना देण्यात आला आहे.
अणदूर, जळकोट येथे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरे उध्वस्त झाले तर अनेकांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या एवढे असूनही संबंधित रस्ते वाहतूक अधिकारी मूग गिळून गप्प का असा संताप सवाल प्रवासी व वाहनधारकातून केला जात असून याचा करता करविता धनी कोण हे मात्र गुलदस्तात आहे.




