spot_img
9.3 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी आश्रम शाळा जळकोट येथे पालक मेळावा संपन्न

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

16 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा जळकोट व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट ता. तुळजापूर जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रम शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला.मेळाव्याचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट संस्थेचे पदाधिकारी माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण साहेब ,प्रमुख पाहुणे रामतीर्थ नगरीचे सरपंच लक्ष्मण राठोड साहेब,संस्थेचे पदाधिकारी तथा जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण साहेब अलियाबाद नगरीचे पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, शंकर वाडीकर,शिवाजी राठोड,मोहन चव्हाण उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथमता पालक प्रवेश करताना लेजीम गीतावर वर नृत्य सादर करुन व प्राचार्य संतोष चव्हाण साहेब व मुख्याध्यापिका आशा पवार मॅडम, नागेंद्र गुरव सर,खंडेराव कारले सर, सुरेश कोकाटे सर व इतर शिक्षक बांधवानी पुष्पगुछ देऊन सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे,पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेंद्र गुरव सर यांनी केले. सुरेश कोकाटे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.संस्थेचे पदाधिकारी प्रकाश चव्हाण साहेब यांनी बोलताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुख सुविधा कमी पडू देणार नाही व इयत्ता आठवीतील कुमारी रेखा दुधाजी जाधव या विद्यार्थिनीला संस्थेने दत्तक घेतले. व यापुढे प्रतिवर्षी एक विद्यार्थ्याला दत्तक घेण्याचे हमी घेतले व बारावी पर्यंत शैक्षणिक खर्चाचे जबाबदारी घेतले.शेवटी प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी पालकाचे प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले.शाळेमध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमा बद्दल, व पुढे तीन महिने कोण कोणते उपक्रम राबवणार आहे या बद्दल माहिती सागितले आलेल्या सर्व पालकांचे आभार मानले व एकंदरीत विचारमेळाव्यात पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल विचार विनिमय करण्यात आला व पालक शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या मेळाव्यात अनेक माता पालक व पालक उपस्थित होते.मेळाव्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण कांबळे सर केले.उपस्थिताचे आभार प्रा. संतोष दुधभाते सरांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या