धाराशिव ( सतिश राठोड ) :-
हिंद- की- चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी सोहळ्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून प्राचार्य संतोष चव्हाण यांची मराठवाडा विभागीय आयोजन समिती मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने निवड केली आहे.
नांदेड येथे 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी राज्य सरकारने क्षत्रिय आयोजन समितीची स्थापना केली असून 350 व्या शताब्दी कार्यक्रमाच्या आयोजन समिती नांदेड विभाग मध्ये तांडा समृद्धी योजनेचे धाराशिव जिल्ह्याचे अशासकीय सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण यांची महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई मार्फत मराठवाडा विभागीय आयोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य मधून निवड करण्यात आली आहे.नांदेड येथे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नांदेडसह छत्रपती संभाजी नगर, धाराशिव लातूर परभणी जालना हिंगोली बीड नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
शीख धर्माचे 9 वे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शीख धर्मात प्रार्थना, परोपकार ,सेवा,साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्त्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला.



                                    
