धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार पै. महेश दादा लांडगे व दत्तात्रय (तात्या )परांडे, युवा नेतृत्व नगरसेवक उदय शेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरातील यावर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्व पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. व तसेच अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे घर संसार उध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. म्हणून यांना मदतीचा हात म्हणून घर उपयोगी संसार साहित्य व गहू ,तांदूळ, साखर ,शेंगदाणे व मसाल्याचे पदार्थ अशा जीवन आवश्यक खाण्याच्या पदार्थाचे 300 कीटचे वाटप करण्यात आले. या कीटचे वाटप जळकोट, जळकोटवाडी नळ, गणेश नगर, बोरमन तांडा, येथील व परिसरातील अतिवृष्टी भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून या किटचे वाटप करण्यात आले .व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य 50 किटचे वाटप करण्यात आले. हे वाटप जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोक भाऊ कदम , डॉ. संजय कदम,बबन मोरे बसवराज भोगे, यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी योगेश अकुलवार, प्रमोद पठारे, जळकोट गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज कदम, गोरख गायकवाड, अमित महाडिक, करण निकम, निखिल पाटील, गणेश सावंत, नारायण वाळके, योगेश भालेराव, सुमित पटेल, प्रदीप तापकीर, तेजस वाळके, रोहन देसाई, राजेंद्र कदम, आकाश करांडे, संतोष पानसरे, किरण माळी ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, नागेश जाधव, नागनाथ कदम व गावातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



                                    
