माळशिरस { संजय निंबाळकर ) :-
कुमारी सानिया कागदी या मुलीने उच्च शिक्षणाच्या जोरावर कठोर परिश्रम करीत यश संपादन केली आहे यामुळे आपल्या आई-वडिलांचा समाजाचा व गावचा सन्मान वाढवला अशी प्रतिक्रिया आमदार अभिजीत आबा पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील दसुर गावच्या एका गरीब कुटुंबातील मुलगी कु. सोनिया शरद कागदे यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवत नुकतीच महसूल सहायक या पदावर नाशिक येथे त्यांची प्रशासनामार्फत नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यांच्या या यशाबद्दल पै.दत्ता मगर यांच्याकडून कुमारी सानिया शरद कागदे यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जंगी सामान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आमदार पाटील बोलत होते. यावेळी सत्कार करण्यासाठी बळीराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भावी जिल्हा परिषद सदस्य दत्ता भैया मगर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी कागदे कुटुंबाच्या सत्कारासाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अभिजीत आबा पाटील तसेच त्यांच्याबरोबर उमेश मालक परिचारक, जानकर, दत्ता भैया मगर, अभिराज पूर्वत, युवराज अंधारे यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सांगितले की, या यशाप्रमाणेच गावातील तालुक्यातील, जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील समाजातील मुलींनी…. या यशाचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी . सानिया यांच्या या यशाबद्दल दसुर गावातून व तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                    
