धाराशिव ( सतिश राठोड ) :-
आंतर महाविद्यालयीन मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत नळदुर्ग ता. तुळजापूर महाविद्यालयाला सुवर्णपदक व सिल्व्हर पदकाचा बहुमान मिळाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर व चिस्तिया कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय खुलताबाद जि. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ व ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित आंतर महाविद्यालयीन मुलीच्या बॉक्सिंग स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालतील कु. अर्चना विलास चव्हाण हिने ४८ कि.ग्रॅ. वजन गटात प्रथम क्रमांक तर कु.प्रज्ञा तानाजी सुरवसे हिने ४८ कि.ग्रॅ. वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवल्या बद्दल सुवर्णपदक व सिल्वर पदकाच्या मानकरी होण्याचा बहुमान याच महाविद्यालयातील दोन्ही मुलींनी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास दादा बोरगांवकर यांच्यासह संस्थेचे सर्व सन्मानीय संचालक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



                                    
