धाराशिव / प्रतिनिधी (सतिश राठोड ) :-
टायगर ग्रुप संघटना, धाराशिव व सोलापूर कडून सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडी व बंकलगी येथील पुरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहाराचे कीट व गणवेश वाटप करण्यात आले.
टायगर ग्रुप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडी व बंकलगी येथे टायगर ग्रुपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार व सोलापूर जिल्ह्यातील टायगर ग्रुप पदाधिकारी एकत्र येऊन येथील २०० शालेय विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहाराचे कीट व गणवेश वाटप करण्यात आले.सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर येथील सीना नदी नदीकाठचे हतुर,सिंदखेड, राजूर, बिरनाळ, औराद, संजवाड या गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला होता. येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते. या भागातील नागरिक रात़्र न रात्र जागून काढली होती. याप्रसंगी सोलापूर टायगर ग्रुपचे बालाजी कोडम, महेश मोकाशी, सोनू पवार, बाबुराव बारडोळे , टायगर ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.



                                    
