धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट
भाई उद्धवराव पाटील शासकीय आयटीआय धाराशिव येथील डी टी पी ओ या व्यवसायाची कु. प्रणाली सावंत हिने यावर्षीच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये मुलींमधून महाराष्ट्रात द्वितीय तर याच व्यवसायाचा कु.प्रतीक गायकवाड हा महाराष्ट्रातून मुलांमधून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. डी टी पी ओ अर्थातच डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर हा एक वर्षाचा व्यवसाय भाई उद्धवराव पाटील शासकीय आयटीआय धाराशिव येथे गेली 15 वर्षापासून सुरू असून याही वर्षी या व्यवसायातील महाराष्ट्रातून पहिल्या तीनमध्ये येण्याची परंपरा कायम राखली आहे. या एक वर्षाच्या व्यवसायामध्ये फोटोशॉप, कोरल ड्रा, एम.एस ऑफिस, वेब पेज डिझाईनिंग, फ्लेक्स डिझाईनिंग,प्रिंटिंग, इन्व्हिटेशन कार्ड डिझाईनिंग व इत्यादी अनेक सॉफ्टवेअरचे ज्ञान ,कौशल्य या व्यवसायात शिकवले जाते .या व्यवसायाचे तज्ञ शिल्प निदेशक श्री अतिश सुरवसे यांनी या दोन्ही उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या घवघवीत यशाबद्दल या विभागातील प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक श्री पी .टी. देवतळे ,उपसंचालक श्री आर. बी. सावळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री प्रवीण औताडे व संस्थेचे प्राचार्य श्री संतोष कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.



                                    
