spot_img
9.3 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

खासदार ओमराजेंनी हंगरगा (नळ) ग्रामस्थांशी साधला व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) या गावाजवळून व साठवण तलावाकडून वाहत येणाऱ्या नाल्याचे पाणी नागरीकांच्या घरांमध्ये घुसले . कांही घरांच्या भिंतीही पडल्या . जनावरांसाठी साठा करून ठेवलेला चाराही वाहुन गेला . हंगरगा – जळकोट रस्त्यावरील पूलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे दोन्ही गावांकडे जाणारी येणारी वहातुक बंद झाली होती . परिणामतः हंगरगा (नळ) गावचे खूप मोठे नुकसान झालेले आहे . हि बाब समजताच, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तथा जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे , हे शिवसेनेच्या कृष्णात मोरे , अनिल छत्रे व रोहन पाटील या पदाधिकाऱ्यांसह हंगरगा (नळ ) गावास भेट दिली . अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीची पाहणी करून प्रशांत नवगिरे यांनी ही सविस्तर माहिती तात्काळ धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना व्हिडीओ कॉल करून सर्व ग्रामस्थांसमक्ष सांगितली . खासदार ओमराजेंनी सर्व नुकसानीची माहिती सविस्तर ऐकून घेऊन , तातडीने याबाबत पंचनामे करून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देतो . काळजी करू नका मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे . असे सांगून, ज्या अरुंद व छोट्या नाल्यामुळे अतिरिक्त झालेले पाणी नागरीकांच्या घरांत घुसले . त्या नाल्याची रुंदी व खोली वाढवून नाला मोठा करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बोलतो असेही सांगितले .
याप्रसंगी उपस्थित हंगरगा (नळ) गावचे विद्यमान सरपंच अतुल कलशेट्टी , उपसरपंच दयानंद चौगुले व अतिवृष्टी बाधित शेतकरी , ग्रामस्थ यांचेशीही खासदार ओमराजेंनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला . यामुळे हंगरगा (नळ ) येशील अतिवृष्टी बाधित शेतकरी, नागरीक व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त करून खासदार ओमराजेंचे आभार मानले .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या