धाराशिव जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर
धाराशिव, दि. २२ सप्टेंबर –
संततधार पावसामुळे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक भागांना बसला असून वाहतुकीसह दळणवळणाच्या सोयींवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत व त्यांचा जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (मा.) आणि शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी संयुक्त आदेश काढून सर्व पंचायत समित्यांना सूचना पाठवल्या आहेत.
👉 उद्या, २३ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील कोणतीही शाळा सुरू राहणार नाही.
- Advertisement -




