धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे
जेलरोड पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे मागील दोन महिन्यापासुन मोटारसायकल चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
सदर गुन्हयाचा तपास करणेकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहा. पोलीस. निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमललदार यांना मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ श्री प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
दिनांक १८/०९/२०२५ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील पोकों युवराज गायकवाड व पोकों- उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळालेवरुन एक विधीसंघर्षग्रस्त बालक चोरी मोटारसायकली विक्री करण्यास हिंदु स्मशान भुमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापुर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्याठिकाणी जावुन सापळा लावला असता त्याठिकाणी एक विधीसंघर्षग्रस्त बालक मिळून आला त्याचेकडुन जेलरोड पोलीस ठाणेकडील एकुण ५ मोटारसायकली एमआयडीसी पोलीस ठाणेकडील १ मोटारसायकल तसेच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान रा विजापुर बेस शुक्रवार पेठ सोलापुर याचे ताब्यातुन १ मोटारसायकल मंगळवेढा पोलीस ठाणेकडील १ मोटारसायकल असे एकुण ८ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर मोटारसायकलची एकुण किंमत ३,३०,०००/- रुपये किमंतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. जेलरोड पोलीस ठाणेकडील व एमआयडीसी पोलीस ठाणेकडील खालील गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत.
१) जेलरोड पोलीस ठाणे गुरन ४७७/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे एम एच १३ सीए ७५९७
२) जेलरोड पोलीस ठाणे गुरनं २२३/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे एम एच १३ बीके ०७५९
३) जेलरोड पोलीस ठाणे गुरन ४२५/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे एम एच १३ बीवाय ७८५३
४) जेलरोड पोलीस ठाणे गुरन ४२८/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे एम एच १३ ईवी १३६६
५) जेलरोड पोलीस ठाणे गुरनं ४५९/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) एम एच १३ सीडी १२११
६) जेलरोड पोलीस ठाणे गुरनं ४४३/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) एम एच १३ डीसी ७५५६
७) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरन ७६९/२०२५ वीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे एम एच १३ सीझेड १४७४
८) मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं ६५८/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे
सदर कामगिरी मा. श्री. एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ श्री प्रताप पोमण सोलापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, सफौ एम. डी. नदाफ, सफी शरिफ शेख, पोलीस हवालदार-धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोकॉ साईनाथ यसलवाड, पोकों-उमेश सावंत, पोकों-युवराज गायकवाड, पोकों-कल्लप्पा देकाणे, पोकों-संतोष वायदंडे यांनी केली आहे.




