spot_img
5.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जि.प. प्रशाला व ग्रामपंचायत कार्यालय जळकोट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जि. प. प्रशाला व ग्रामपंचायत कार्यालय जळकोट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमता जिल्हा परिषद प्रशाला येथे शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विजय पिसे यांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.व ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे यावेळी गावातील करांची बाकी भरलेल्या भाग्यवान कर दाते श्री काशिनाथराव व्यंकट कदम वाडीकर यांना तो ध्वजारोहण करण्याचा मान ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आला. प्रथमता त्यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले व काशिनाथराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व राष्ट्रगीत गायन करत ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोकराव भाऊ कदम, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत भाऊ कदम, ग्रामपंचायत सदस्य बसराज कवठे, कल्याणी साखरे, बसवराज कवठे, शिवाजी सुुुुरवसे, संतोष वाघमारे, नामदेव कागे, मेघराज किलजे , भैय्या किलजे, प्रशांत कारले,सुनील लोखंडे, नारायण पटणे, राजेंद्र कारले, माजी सैनिक भरत पाठक, तुकाराम कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, रुक्मुद्दीन तांबोळी, दिनकर कदम, जितेंद्र कदम, तसेच ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशाताई, शिक्षकवृंद, पत्रकार बांधव, गावातील युवक ,नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या