धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक अविनाश मोकाशे रुजू झाल्याबद्दल तर सशिक्षिका रेखा सोनटक्के यांची प्रशासकीय बदली झाल्याने या दोघांचा सत्कार करण्यात आला.
- यापूर्वी घोडके तांडा खुदावाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून सहशिक्षक अविनाश मोकाशे यांनी काम पाहिले आहेत. घोडके तांडा शाळेतून त्यांची पाटील तांडा खुदावाडी येथे प्रशासकीय बदली झाली आहे त्यांनी येथील शाळेचा पदभार स्वीकारला ते एक आदर्श शिक्षक आहेत सहशिक्षक मोकाशे यांनी अनेक पुरस्कार देखील पटकावले असून शिक्षक संघटनेचे नेते आहेत सहशिक्षक अविनाश मोकाशे यांनी पाटील तांडा खुदावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदभार घेऊन शाळेत रुजू होताच येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सह अविनाश मोकाशे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर सहशिक्षक रेखा सोनटक्के यांचा देखील सत्कार करून निरोप देण्यात आला . याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार , ताराबाई पवार , सामाजिक कार्यकर्ते सुधीर राठोड , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल राठोड , उपाध्यक्ष विकास राठोड ,गुरुनाथ राठोड , पोपट राठोड, शंकर राठोड , राम राठोड , मदतनीस अनुसया पवार सह पालक उपस्थित होते .
- Advertisement -