धाराशिव (सतीश राठोड ) :-
मराठवाड्यातील बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट महसूल रेकॉर्ड नोंदी नुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा बांधव एकवटले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी मंदिर सभागृहात पोहरादेवी येथील बंजारा धर्मगुरू महंत शेखरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाड्यातील बंजारा समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख सकल बंजारा पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविक माजी जिप सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले. इतर मान्यवरांनी एसटी आरक्षण संदर्भात पुढील दिशा ठरविण्याबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या. मराठवाड्यातील बंजारा समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पुढील दिशा ठरविण्यात आली असून या मागणीकरीता 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व धाराशिव जिल्हाधिकारी यांना धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा बांधवांच्या वतीने या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे बैठकीत एकमताने ठराव मंजूर केले.सत्ताधारी सरकारने बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी समिती गठीत करून समितीच्या माध्यमातून नोंदी तपासून एसटी प्रवर्गाचा शासन निर्णय पारित करावेत. हैद्राबाद गॅझेट निजाम काळातील महसूल रेकॉर्ड सण 1881 ते 1941 च्या जनगणनेतील ऐतिहासिक नोंदी तपासून अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,यांच्याकडे केली आहे . सत्ताधारी सरकारने सकल बंजारा बांधवांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा बांधवांनी दिलाय. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार , प्राचार्य संतोष चव्हाण , हरीश जाधव, माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण , लक्ष्मण चव्हाण सर , अमृता चव्हाण , वसंत पवार ,दामाजी राठोड , माजी नगरसेवक छिमाबाई राठोड , कैलास चव्हाण, सुरेश राठोड, रवी महाराज , सुशील राठोड , डॉक्टर सुरज चव्हाण , कवी गुलाब चव्हाण , एडवोकेट राज राठोड , सचिन जाधव , उद्योजक सचिन राठोड , राहुल राठोड, टायगर ग्रुप सचिन पवार , गोरसेनेचे राजू चव्हाण, संजय आडे , दत्ता राठोड,मोतीराम राठोड सर , प्रकाश चव्हाण , गोविंद राठोड,ब़कंट राठोड,बालाजी आडे सह धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार हरिश जाधव यांनी मानले.