धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री केदारलिंग मंदिर जवळ असलेल्या जय महाकाल गणेश तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रख्यात लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड साहेब(पांगरी ता. बार्शी) यांचे ‘कालचे स्वराज्य आजचे मावळे ;या विषयावर दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या व्याख्यान कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान जय महाकाल गणेश तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.