spot_img
16.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोटच्या श्री कुलस्वामिनी आश्रम शाळेत भटके विमुक्त दिन साजरा

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

दि 31 ऑगस्ट 2025 रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा जळकोट व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष चव्हाण साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून अलियाबाद नगरीचे विद्यमान सरपंच सूर्यकांत चव्हाण गुरुजी, नागेंद्र गुरव सर, खंडेराव कारले सर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. बंजारा, धनगर समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून बंजारा नृत्य ,गीत सादर केले कुमारी राठोड अक्षरा इ 9 वी विद्यार्थीनी बंजारा भाषेत आपली संस्कृती परंपरा कशी होती आता कशी आहे यावर चांगल्या पद्धतीने भाषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिटिशांच्या राज्यकाळात १८७१ मध्ये ‘क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट’ या काळ्याकुट्ट कायद्याने अनेक भटक्या व पारंपरिक जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरवले. समाजातील या घटकांना गुन्हेगारीची शिक्कामोर्तब ओळख देण्यात आली. 1952 मध्ये स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला व या जमातींना ‘विमुक्त’ असे संबोधले गेले. तरीही समाजाने त्यांच्या माथ्यावर बसवलेली ‘गुन्हेगार’ ही ओळख पुसली गेली नाही. आजही अनेक ठिकाणी त्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात तितक्याच अडचणींना सामोरे जावे लागते. व अनेक उदाहरण भटके विमुक्त बद्दल माहिती सांगितले
यावेळी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका पवार आशा मॅडम, श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम, महाविद्यालयाचे ,प्रा अप्पासाहेब साबळे सर, प्रा संतोष दुधभाते सर,प्रा बालाजी राठोड सर, प्राध्यापिका प्रमिला कुंचगे मॅडम,प्रा अश्विनी लबडे, माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक बिळेणसिध्द हक्के सर, किरण ढोले सर,,बाळासाहेब मुखम सर ,कल्पना लवंद मॅडम, कुमारी मयुरी कांबळे मॅडम, ,दुर्गेश कदम सर, श्री बंकट राठोड सर, अमित खारे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कांबळे सरांनी तर आभार देवानंद पांढरे सरांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या