धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुका चौदा वर्षाखालील मुलींच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धी मिटकर ने तालुक्यातुन द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादित केले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागामार्फत राज्यातील मुलांच्या क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील 14 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन अणदूर येथील श्री.श्री.रविशंकर विद्यालयात झाले.
तालुक्यातील जवळपास 219 शाळा व 9000 मुलींमधून सुरुवातीला शालेय स्पर्धा घेतल्या गेल्या.त्यामध्ये तालुका स्तरावर पात्र झालेल्या मुली निवडल्या गेल्या.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीतून सिद्धी मिटकर ने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला व जिल्हास्तरासाठी पात्र झाली.
लोटस पोदार इंग्लिश स्कूल तुळजापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय शहापूरे तसेच बुद्धिबळ मार्गदर्शक श्री.अशोक बनकर,श्री.माऊली भुतेकर यांचे मार्गदर्शन सिद्धीला लाभले.
या यशाबद्दल सिद्धीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.