spot_img
9.3 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

विपुल पिसे चे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी विपुल विजय पिसे इयत्ता नववी याने घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. दिनांक २५-८-२५ रोजी झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अणदूर येथे करण्यात आले होते. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील विविध शाळेतील १७८ इच्छुक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १७ वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जिल्हा परिषद प्रशाला जळकोटचा विद्यार्थी विपुल विजय पिसे याने घवघवीत यश संपादन केल्याने होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक संतोष सारणे सर, समाधान पवार सर, जयराम शिंदे सर, पुष्पलता कांबळे मॅडम, बनपट्टे सर, सुरवसे मॅडम, कदम मॅडम, यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल पालक वर्गातून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या