spot_img
16.9 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोट परिसरात बळीराजाने केला पोळा सण उत्साहात साजरा

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

राजा, सर्जाचा सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्याचा खरा साथीदार म्हणजे बैल, जळकोट गावातील कुटुंबीयांनी बैलपोळा सण हा उत्साहात साजरा केला. शेतकऱ्यांनी आपल्या कष्टकऱ्या बैलांना आंघोळ घालून, शिंगाना वारणेस लावून विविध कलर ने सजावट करून शिंगोटे, घागरमाळ, झुली, झालर अशा पद्धतीने सजावट करून बैलांची व इतर पशुधनाची औक्षण केले . तर शेतकऱ्यांनी बैलांना हरभऱ्याचे व गोड पदार्थाचे खाद्य दिले.व जळकोट येथील काही सदन शेतकऱ्यांनी गावातून वाजत गाजत हलगीच्या कडकडाटत मिरवणूक काढल्या. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हा संकटात असताना तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पूजा करून बैलांना व इतर पशुधनांना पुरणपोळीचे जेवण दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपास सोडला .शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा हा सण यंदाही आनंदात व पारंपरिक पद्धतीने पार पडला.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या