धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
पती निधनाच्या दु:खावर मात करत ११ वर्षीय मुलीचे शिक्षण व पालण पोषण करत जिद्दीने पोलीस दलात भरती होण्याची तयारी करून तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील कन्या तेजस्वीनी विशांत वाघमारे – लोंढे यानी पोलीस दलात दमदार प्रवेश मिळवून नुकतच लोणावळा पुणे येथील पोलीस प्रशिक्षण केंदातून पोलीस काँस्टेबल पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून रितसर धाराशिव पोलीस दलात रुजू झाल्या आहेत.ही एक आभिनंदयीन बाब असून त्यांचा सिध्दार्थ कला व क्रिडा मंडळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) शाखा येडोळा च्या वतीने येथोचित सत्कार करण्यात आला.
नुकतच सिद्धार्थ कला व क्रिडा मंडळ येडोळा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)शाखा येडोळाच्या संयुक्त विद्यामाने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील जेष्ठ कार्यकर्ते रमेश लोंढे हे होते तर प्रमुख पाहणे म्हणून भाजपाचे नंदगाव जि.प. गटाचे गट प्रमुख सिद्धू आण्णा कोरे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइंले नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून नुतन पो.कॉ.तेजस्वीनी वाघमारे-लोंढे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल अरुण लोखंडे तर नंदगावचे नुतन सरपंच शशिकांत नागीले आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अमर जेटीथोर यानी केले.
यावेळी दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले, रिपाइंचे जळकोट शाखा अध्यक्ष,आरविंद लोखंडे, डीबीएन चे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, रिपाइंचे तालूका संघटक सुरेश लोंढे, अर्जुन लोंढे,रिपाइंचे येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, उपाध्याक्ष मारुती लोंढे,अमित लोंढे,भानुदास लोंढे,दिलीप भांगे,डॉ.सुरज लोंढे, सुनिता लोंढे,सुवर्णा लोंढे,शितल लोंढे,रेखा लोंढे,रतन लोंढे,स्नेहा लोंढे सह महिला,ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.