अणदूर, प्रतिनिधी दि.१६ ऑगस्ट
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे राज्यस्तरीय ऑलिम्पियाड परीक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते तर सचिव तथा उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार,ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके – पाटील,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य डॉ हरिदास मुंडे,संतोष मोकाशे,मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांची उपस्थिती होती.
मागील वर्षी झालेल्या राज्यस्तरीय ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या प्रद्युम्न महाबोले, श्लोक पोतदार , प्राजक्ता झांबरे, श्लोक घाडगे, प्रांजली झांबरे, लक्ष्मी बिराजदार, वरद जाधवर, राजवीर कोरे, आर्या कुलकर्णी, आराध्या कोणाळे, अद्विक घुगे,सोमेश्वर आलुरे या ओलंपियाड दुसरी लेवल पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ कानडे म्हणाले की, श्री श्री गुरुकुल हे स्पर्धात्मक परीक्षा तयारी करण्याचे केंद्र बनले आहे.या शाळेतील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करीत आहेत.पुढील काळात गुरुकुल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे उत्तम केंद्र म्हणून ग्रामीण भागांमध्ये नावलौकिक मिळवले यात शंका नसल्याचे सांगितले तर ऑलंपियाड दुसरी परीक्षा पास होणे हे खूप अवघड असून इंग्रजी,गणित व विज्ञान या विषयांमध्ये ही विद्यार्थी यशस्वी होत आहे या सर्वांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रियंका सूर्यवंशी, दीप्ती काजळे,उषा बिराजदार, अंकिता बेलकुंदे, सुरेखा चव्हाण चव्हाण, इरफाना मुलानी, विशाल महाबोले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफाना मुलाणी यांनी तर आभार रामेश्वर सावंत यांनी मानले.