धाराशिव प्रतिनिधी :- (दि.१४ ऑगस्ट)
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आज घरोघरी तिरंगा -२०२५ अंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रॅलीत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी विश्वास करे,जिल्हा रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरुव, उपअभियंता (सा.बा.विद्युत) जी.आर. सिरसाळकर सांख्यिकी सहाय्यक गणेश खांडेकर,श्रीमती कल्पना काशीद, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी प्रवीण बागल आदीसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा विभागाच्या आयोजनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत शहरातील खो-खो,खेलो इंडिया सेंटर,श्रीपतराव भोसले हायस्कूल,छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील २०० विद्यार्थी तसेच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.ही रॅली जिल्हाधिकारी येथून निघून पोलीस अधीक्षक कार्यालय मार्गे,महात्मा बसवेश्वर चौक,बार्शी मार्गावरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत रॅलीचा समारोप करण्यात आला.